जागतिक महिला दिनानिमित्त 'पीएमपी'च्या ३१ मार्गांवर धावणार लेडीज स्पेशल बस, मोफत प्रवासाचा आनंद मिळणार
पिंपरी, ता. ६ - जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महिला प्रवाशांसाठी एकूण ३१ मार्गांवर मोफत बसप्रवास करता येणार आहे. महिला दिनी महिलांना मैत्रिणींसोबत मोफत प्रवासाचा वेगळा आनंद देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये, एकूण ३१ मार्गांवर धावणाऱ्या ३३ बसेसना नियोजित केलेल्या ७६ महिला विशेष फेऱ्यांद्वारे महिला प्रवाशांना (विनातिकीट) मोफत प्रवास करता येणार आहे.
मोफत प्रवासाचे मार्ग खालीलप्रमाणे -
मार्ग क्रमांक - ११७ - स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर
मार्ग क्रमांक - १६५ - मनपा भवन ते वडगांव शेरी
मार्ग क्रमांक - ९४ - कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
मार्ग क्रमांक - ८२ - एनडीए गेट क्र. १० ते मनपा भवन
मार्ग क्रमांक - २ अ - कात्रज ते शिवाजीनगर
मार्ग क्रमांक - २४ - कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
मार्ग क्रमांक - ३८ - धनकवडी ते न.ता.वाडी
मार्ग क्रमांक - १०३ कात्रज ते कोथरूड डेपो
मार्ग क्रमांक - ६४ - हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी
मार्ग क्रमांक - १११ - भेकराईनगर ते मनपा भवन
मार्ग क्रमांक - १४९ - हडपसर ते निगडी भक्ती शक्ती
मार्ग क्रमांक -१८८ - हडपसर ते कात्रज
मार्ग क्रमांक - २९१ - हडपसर ते कात्रज
मार्ग क्रमांक - ३०१ - लस्वारगेट ते हडपसर गाडीतळ
मार्ग क्रमांक - एच ९ - हडपसर ते मांजरी बु.
मार्ग क्रमांक - ११ - मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
मार्ग क्रमांक - १३ - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर
मार्ग क्रमांक - १४० - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन
मार्ग क्रमांक - १७० - पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
मार्ग क्रमांक - मनपा भवन ते मुकाई चौक किवळे
मार्ग क्रमांक - ३७२ - निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी
मार्ग क्रमांक - १२१ - मनपा भवन ते भोसरी
मार्ग क्रमांक - ३२४ - भोसरी ते हिंजवडी माण फेज ३
मार्ग क्रमांक - ३६७ - भोसरी ते निगडी
मार्ग क्रमांक - ३०२ - भोसरी ते पिंपरी गाव
मार्ग क्रमांक - ३०४ -भोसरी ते चिंचवड गाव
मार्ग क्रमांक - ३५५ -चिखली ते डांगे चौक
मार्ग क्रमांक -१६७ - भेकराईनगर ते वाघोली
मार्ग क्रमांक - १४८ - शेवाळेवाडी ते पिंपळे गुरव
मार्ग क्रमांक - ३०१ - शेवाळेवाडी ते कात्रज
मार्ग क्रमांक - ११४ - मनपा भवन ते म्हाळुंगे गाव