news
clock
जागतिक महिला दिनानिमित्त ओतूरमध्ये ७ मार्चला खास कार्यक्रम.... 'Folk आख्यान'

जागतिक महिला दिनानिमित्त ओतूरमध्ये ७ मार्चला खास कार्यक्रम.... 'Folk आख्यान'

जागतिक महिला दिनानिमित्त ओतूरमध्ये ७ मार्चला खास कार्यक्रम.... 'Folk आख्यान'

पिंपरी, ता. ४ -  जागतिक महिला दिना निमित्त ओतूर (ता. जुन्नर) येथे स्व. वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने ७ मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. मुख्य सन्मान सोहळ्यानंतर 'Folk आख्यान' हा मराठी संस्कृती उलडणारा, युवा कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम पाहणयाची सुंदर संधीही मिळणार आहे.

ओतूरमधील चैतन्य विद्यालयात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे प्रमुख पाहुण्या असतील. त्यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक अनिता गोसावी, दहा हजारांहून अधिक बाळंतपणे करणारी सुईण शांताबाई जाधव, कोकणकन्या सावि मुद्राळे, ओतूर येथील पहिली आंतरराष्ट्रीय वैमानिक अक्षता डुंबरे, ओतूर येथील प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या प्रियांका पानसरे, इंदिरा आस्वार डावरे, स्वाती डुंबरे, ऋतुजा डुंबरे यांचा 'शिवकन्या पुरस्कार' प्रदान करुन सन्मान होईल.

या निमित्ताने शिवजन्मभूमित प्रथमच 'Folk आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य न घेता चाळीस पारंपरिक वाद्य घेऊन साकारलेला अविस्मरणीय शिवसोहळा पाहण्यासाठी आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी समस्त शिवजन्मभूमीतील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories