news
clock
औद्योगिक कामगार सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांना मार्गदर्शन

औद्योगिक कामगार सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांना मार्गदर्शन

औद्योगिक कामगार सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांना मार्गदर्शन 

पिंपरी, ता. ६ - औद्योगिक कामगार सुरक्षा सप्ताहानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवारी (ता. ४) थरमॅक्स चौकात 'सुरक्षित काम, सुरक्षित जीवन' कार्यक्रम पार पडला. यावेळी कामगारांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. सर्वांनी सुरक्षित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची शपथ घेतली. 

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड, सुनील भोसले, दिलीप डिकोळे आणि कामगार उपस्थित होते. 

नखाते म्हणाले,  ''पुणे जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. लाखोंच्या संख्येने कामगार येथे काम करतात. कंत्राटी, असंघटित कामगारांचे प्रमाणही मोठे आहे. केवळ सुरक्षा सप्ताहाचे कंपन्यांच्या समोर फलक लावून उपयोग होणार नाही तर कामगारांसाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची प्राधान्याने आवश्यकता आहे.  कामगारांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. कारखान्यातील अपघात पाहता कामगारांना सुरक्षिततेच्या प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories