news
clock
चिंचवडमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख २८ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त

चिंचवडमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख २८ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त

चिंचवडमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख २८ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त

पिंपरी, ता. २ - चिंचवड परिसरात बुधवारी (ता. १) पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण १ लाख २८ हजार ५६०/- रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. आठ जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १) गुरुद्वाराजवळ आरोपी जीवन वाघमारे याच्या घराच्या टेरेसवर ८ जण फ्लॅश नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी तेथे छापा टाकला. पत्ते व रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण १,२८,५६०/- रुपयांचा माल जप्त केला. 

जुगार खेळणाऱ्या आरोपींमध्ये १) राजू ओमचंद कागडा (वय ५४ वर्षे, रा. देहुरोड), २) देवराज रत्नम स्वामी ( वय ५२ वर्षे, रा. साईनगर, मामुर्डी), ३) रमेश फकीरा सांळुके (वय ४४ वर्षे, रा. मोशी), ४) संदिप हरीभाऊ केंदळे (वय ५० वर्षे, रा. बिजलीनगर, चिंचवड), ५) सचिन बाळकृष्ण चौगुले (वय ४४ वर्षे, रा. चिंचवड), ६) गोपाळ राजेंद्र शर्मा (वय ४२ वर्षे, रा. विवेकनगर, आकुर्डी), ७) शैलेश मेदनीकांत शर्मा (वय ४१ वर्षे, रा.जांबे, ता. मुळशी) व ८) जीवन ज्ञानोबा वाघमारे (वय ३५ वर्षे, रा. गुरुद्वाराजवळ, चिंचवड) यांचा समावेश आहे.

पोलीसांनी गुरुवारी (ता. २) आरोपींविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा, कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories