news
clock

 गांजा बाळगणाऱ्या इसमास मौजे चऱ्होली अटक

पिंपरी, ता. ७ - मौजे चऱ्होली येथे सार्वजनिक ठिकाणी ३६२ ग्रॅम वजनाचा १८,१००/-  किंमतीचा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी एका इसमाला शुक्रवारी (ता. ६) दिघी पोलिसांनी अटक केली.  

आरोपी महादेव जिवन शिंदे (वय ५२ वर्षे, रा. वडमुखवाडी) याने  ३६२ ग्रॅम वजनाचा १८,१००/- रु. किंमतीचा गांजा हा बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगला होता. मौजे चऱ्होली परिसरात क्रिस्टल सिटी सोसायटी परिसरात हा इसम आढळून आला.

आरोपीविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) नुसार  दिघी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories