कोयत्याने वार आणि डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; 6 जणांना अटक

कोयत्याने वार आणि डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; 6 जणांना अटक

तळेगाव | 31 ऑगस्ट 2026 : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात, हातावर, छातीवर आणि पाठीवर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर डोक्यात मोठा दगड मारून त्याची हत्या केल्याची घटना वराळे येथे घडली. याप्रकरणी 8 जणांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव प्रशांत शिंगाडे असे आहे. याबाबत त्याचे वडील सुभाष विष्णू शिंगाडे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास एस. डी. फोटो स्टुडिओ, शिक्षक कॉलनी, वराळे, ता. मावळ येथे घडली. गुन्हा सकाळी 8:56 वाजता नोंदवण्यात आला.

पोलिसांनी साहिल पांडुरंग समुखराव, सुनील पांडुरंग समुखराव, यश दीपक लोखंडे, रोहन हनुमंत सावंत, हेमराज गौतम सोनवणे आणि रोशन साव, तसेच 2 विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी साहिल, सुनील, यश, रोहन, हेमराज आणि रोशन यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत मित्रांसोबत चहा पिण्यासाठी थांबला होता. त्यावेळी आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत जुन्या भांडणाच्या रागातून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर डोक्यात मोठा दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी गुन्हा क्रमांक 248/2026 नोंदवण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories