पूर्णानगरमध्ये एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपलब्ध
Mar 27 2026
35
पूर्णानगरमध्ये एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपलब्ध
पिंपरी, ता. २७ - पूर्णानगर (चिंचवड) ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) काढण्याची सुविधा पूर्णानगरमध्येच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दिनांक २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रीकृष्ण एम्पायर, पूर्णानगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हे कार्ड काढता येणार आहे, अशी माहिती पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघांचे कार्याध्यक्ष सुनील कदम यांनी दिली.
एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी दिव्यांगासह ज्येष्ठ नागरिक आणि महिला एसटी आगारात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र, आगारात दररोज होणारी गर्दी आणि वेळ लक्षात एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा पूर्णानगर येथे उपलब्ध करुन देण्याची मागणी पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने एसटी महामंडळ प्रशासनाला केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आठ दिवस पूर्णानगरमध्ये कार्ड काढून देण्याची सुविधा दिली आहे. नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे कदम यांनी सांगितले.