news
clock
जिल्हास्तरिय स्काऊट-गाईड मेळावा चिंचवडमध्ये उत्साहात

जिल्हास्तरिय स्काऊट-गाईड मेळावा चिंचवडमध्ये उत्साहात

जिल्हास्तरिय स्काऊट-गाईड मेळावा चिंचवडमध्ये उत्साहात 

पिंपरी, ता. ९ - चिंचवड येथील ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेमध्ये शनिवारी (ता. ७)  शंकरलाल मुथा स्काऊट गाईड नगरीत जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन  झाले. प्रारंभी लॉर्ड व लेडी बेडन पॉवेल, शंकरलाल मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

पुणे भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद पुणे, फत्तेचंद जैन विद्यालय व ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने या स्काऊट-गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यामध्ये ३१ शाळांमधील स्काउट-गाईड पथकातील १ हजार १८ विद्यार्थी सहभागी झाले.

मेळाव्याला चंद्रकांत वाघमारे, मिलिंद दीक्षित, राजेंद्रकुमार मुथा, अनिलकुमार कांकरिया, राजेशकुमार सांकला, अजित वडगावकर, माणिक बांगर, सतीश भारती, विजयकुमार जोरी, राफेल जॉन, सारंगा भारती, विक्रम काळे, हनुमंत मारकड, सीमा लिभोरे, मनीषा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संध्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories