दीड लाखांचे अंमली पदार्थ चिंचवडेनगरमध्ये जप्त, आरोपीला अटक  

पिंपरी, ता. ६ - बेकायदेशीरपणे १ लाख ६९ हजार १५४/- रुपयांचा अफिम व पॉपी स्ट्रॉ हे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमाला  चिंचवडेनगर-चिंचवड येथून पोलिसांनी अटक केली आहे.  पदमाराम सोनाराम देवासी (वय ४९ वर्षे, रा. बर्गेवस्ती, चिंबळीफाटा, चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ५) चिंचवडेनगर येथे सार्वजननिक शौचालयासमोर

आरोपी देवासी याच्याजवळ एकुण १,६९,१५४/- किंमतीचा १०५.५ ग्रॅम वजनाचा अफिम, ९२८.०९ ग्रॅम वजनाचा डुडाचुरा (पॉपि स्ट्रॉ) तसेच  दोन मोबाईल, वजनकाटा व मोटारसाकल असा माल सापडला. 

हे अंमली पदार्थ त्याने विक्रीसाठी बाळगले होते. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) प्रमाणे त्याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance