पिंपरी-चिंचवड विकसित व आत्मनिर्भर बनवण्यासाठी  मी महापौर या नात्याने कटिबद्ध - महापौर रवी लांडगे 

निवड प्रक्रियेनंतर पत्रकारांशी संवाद 

पिंपरी, ता. ७ - ''मला आज महापौरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबद्दल सर्व शहरवासियांचे मनापासून आभार. ही निवड लोकशाही मूल्यांचा आणि शहराच्या एकत्रित वाटचालीचा सन्मान आहे. पिंपरी-चिंचवड शहराला विकसित व आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि विकास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी मी महापौर या नात्याने कटिबद्ध आहे.  सर्वांच्या सहकार्याने शहर समृद्ध बनवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.'', असा विश्वास पिंपरी-चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

विशेष सभेमध्ये महापौर पदावर निवड झाल्यानंतर रवी लांडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेली विकसित भारताची संकल्पना हे केवळ धोरण नाही तर प्रत्येक नागरीकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी दिशा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मला महापौर होण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन,गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी शहराला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीन. सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला महापौरपद देऊन भारतीय जनता पक्षाने माझे चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या संघर्षाचा सन्मान केला आहे. माझ्यासोबत उपमहापौर पदावर निवड झालेल्या शर्मिला बाबर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह माझ्या निवडीसाठी  पाठिंबा दिेलेल्या सर्व नगरसेवकांचे ल विरोधी पक्षातील सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.''

पुढे, रवी लांडगे म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतून प्रेरणा घेत डिजीटल प्रशासन, ई गव्हर्नन्स, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्मार्ट सिटी उपक्रम, डिजीटल सेवा, पर्यावरणपूरक प्रकल्प व हरितक्षेत्र वाढवणे यावर विशेष लक्ष दिले जाईल. नदी स्वच्छता, पावसाळी पाणी व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील अचडणी, कामगार प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन व शहरातील दुर्लक्षित भागांचा विकास या मुद्दयांवर प्राधान्याने काम करण्यावर माझा भर असेल. शहरातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे हेच माझे ध्येय आहे. त्यासाठी शासन, महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय नगरसेवक व नागरीक यांच्या सहकार्याने पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न आहे. शहराच्या हितासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहे. महापौर म्हणून मी कोणताही पक्षभेद न  ठेवता संपूर्ण शहराचा महापौर म्हणून काम करेन. सर्व प्रभागांना समान न्याय देणे, दुर्लक्षित घटकांपर्यंत सुविधा पोचवणे व नागरीकांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने हाताळणे हे माझे प्रमुख उद्दीष्ट राहील. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक वाहतूक या मूलभूत बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल.प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरीक यांच्यात समन्वय साधून निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक केली जाईल.''

''विकास कामांमध्ये आणि शहराच्या वाटचालीमध्ये  नागरीकांचा सहभाग वाढावा यासाठी संवादाचे मार्ग खुले ठेवले जातील. नागरीकांनी केलेल्या तक्रारींचे  वेळेत निवारण व विकासकामांचा दर्जा यावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल. ही जबाबदारी मी स्विकारली आहे. सर्वांच्या सहकार्याने शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि मानवी मूल्यांवर आधारिक विकास करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.'' असे महापौर लांडगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance