news
clock
नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू - आयुक्त श्रावण हर्डीकर

नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू - आयुक्त श्रावण हर्डीकर

नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू - आयुक्त श्रावण हर्डीकर 

महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत  बैठक

पिंपरी, ता. १३ - महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच  झाली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्प तयार करताना विविध विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू राहील. आर्थिक परिस्थिती, पारदर्शकता आणि परिणामकारकता यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम जून २०२५ पासून सुरू होते. नागरिकांनीही १० लाख रुपये खर्चापर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यांचा समावेश करून अंतिम अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करणार आहेत. 

 २० फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड होईल. सदस्यांच्या निवडीनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्ष निवडीनंतर महापालिका आयुक्त व मुख्य लेखाधिकारी स्थायी समितीपुढे अर्थसंकल्प सादर करतील. स्थायी समितीत चर्चा होऊन सदस्य हरकती व सूचना मांडतील, त्यानंतर मंजुरी देतील. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन नगरसदस्य हरकती व सूचना मांडतील. नगरसदस्यांच्या उपयुक्त सूचनांचा समावेश करून अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळेल                         

   एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories