हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ  शहर भाजपकडून 'जोडे मारो' आंदोलन

पिंपरी, ता. १६ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त  वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या तीव्र निषेध करण्यात आला. पिंपरी  चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध नोंदवला. “सपकाळ यांना पदावरून बडतर्फ करा,” अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार उमा खापरे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव आणि मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे यांनी आपल्या भाषणातून सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. 

“छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यांची तुलना धर्मांध टिपू सुलतानशी करणे हे ऐतिहासिक अज्ञान असून असा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या विषयावर आम्ही ठाम आहोत. संबंधितांकडून तात्काळ माफी आणि योग्य ती कारवाई झाली नाही, तर जनतेच्या भावनांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन उभारू. शिवरायांचा सन्मान अबाधित ठेवणे हीच आमची भूमिका आणि बांधिलकी आहे,” , अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी हरीश मोरे, युवराज लांडे, देविदास साबळे, कैलास सानप, खंडूदेव काठारे, सतीश नागरगोजे, दिपक नागरगोजे, गणेश ढाकणे, देवदत्त लांडे, डॉ. हेमंत देवकुळे आणि हेमचंद्र मासुळकर यांनीही यावेळी भावना व्यक्त केली. 

आंदोलनात दक्षिण भारत आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मधुकर बच्चे, नगरसेवक अनुराधा गोरखे, विजय उर्फ शीतल शिंदे, सागर गवळी, राजू मिसाळ, डॉसुहास कांबळे, कोषाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर, प्रवक्ते कुणाल लांडगे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, मोहन राऊत, अनिता वाळूंजकर, अजित कुलथे, विजय शिनकर, मनोज ब्राह्मणकर, गणेश ढाकणे, देवदत्त लांडे, खंडू कठारे, कैलास सानप, मनीष पंजाबी, युवराज लांडे, सतपाल गोयल, देविदास साबळे, नंदू कदम, दीपक नागरगोजे, युवराज ढोरे, सतीश नागरगोजे, बिभीषण चौधरी, नेताजी शिंदे, हरीश मोरे, दिलीप गडदे, शिवदास हांडे, संतोष टोणगे, हेमंत देवकुळे, सचिन उदागे, रवींद्र सानप, रोहित मोखा, सुमित घाटे,राहुल खाडे, साची दोशी, प्रतीक रामगुडे, साईराज भालेकर, ऋषी भालेकर, गोपाल मंडल, दिनेश काटे, मनोज घोडेकर, अभिजित बागुल, आदम मुलाणी, अजय मोरे, उमेश सांडभोर, गौरव शिरुडे, प्रज्योतसिंग हंस, वैभव लंभाते, वरद अंबिके, सुधीर साळूंखे, मयुर काळभोर, जालिंदर काटे, विजय दळवी, ओमकार पवार, निखिल सहाणे, संजय परळीकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance