news
clock

महापौर रवी लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवड व पुण्याती एकूण ५२ नगरसदस्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आक्षेप

सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले यांची पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार

पिंपरी, ता. ५ - पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील २६ आणि पुण्यातील २६, अशा ५२ नगरसदस्यांचा कुणबी जात प्रमाणपत्रावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्याविषयी पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे जानेवारीत तक्रार करण्यात आली आहे. त्याची सुनावणी शुक्रवारपासून (ता. ६) समितीच्या विश्रांतवाडीतील कार्यालयात सुरू होत आहे. महापौरांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोलवले आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रांवरून अनेकदा आक्षेप घेण्यात आले. कुणबी जात प्रमाणपत्र हे इतर मागासवर्गीय संवर्गात (ओबीसी) अर्थात 'नागरिकांचा मागास प्रवर्ग' या संवर्गात येते. त्यामुळे खुल्या (ओपन) संवर्गातील काही जण ओबीसी राखीव जागांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवतात. त्यामुळे खऱ्या ओबीसी उमेदवारांवर अन्याय होतो, अशी तक्रार केली जात आहे. 

मृणाल ढोले पाटील यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नगरसदस्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की "नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी असल्याचा दावा करून मराठा समाजातील उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह पुणे, पिंपरी चिंचवडमधील नगरसदस्यांचा समावेश आहे."


ढोले पाटील म्हणाले, "या विषयात सरकार कुठलीही मदत करत नाही. उलट अशा पद्धतीने आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्यांना समर्थन देते. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर निश्चित न्यायालयात जाऊ, काही नगरसेकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुनावणी प्रक्रिया योग्य रितीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा आहे. ओबीसी महासंघ समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे लढा देणार आहे."

- जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप असलेले उमेदवार -

पुणे : (भाजप - १७, राष्ट्रवादी- ९) : रेखा टिंगरे, रवी टिंगरे, श्रेयस खांदवे, अनिल सातव, रत्नमाला सातव, नारायण गलांडे, भक्ती गायकवाड, बाबुराव चांदेरे, किरण दगडे, हर्षवर्धन मानकर, हेमलता मगर, राजेंद्र शिळीमकर, सिद्धी शिळीमकर, कल्पना बहिरट, राघवेंद्र मानकर, स्वप्नील दुधाने, दिनेश माथवड, भरत बोराटे, हरिदास चरवड, ज्योती गोसावी, शैलजा भोसले, किशोर धनकवडे, स्मिता कोंढरे, प्रतीक कदम, वृषाली कामठे, निवृत्ती बांदल.

पिंपरी चिंचवड (भाजप - १७, राष्ट्रवादी काँग्रेस ७, शिवसेना- २) विकास साने, नितीन काळजे, हिराबाई घुले,भीमाबाई फुगे, सागर गवळी, रेखा देवकर, रवी लांडगे, विराज लांडे, सुप्रिया चांदगुडे, प्रवीण भालेकर, अर्चना कारंडे, कैलास कुटे, ऐश्वर्या तरस, भाऊसाहेब भोईर, मनीषा लांडे, संदीप वाघेरे, नीता पाडळे, तानाजी बारणे, विश्वजीत बारणे, आरती चौंधे, सविता खुळे, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, स्वाती काटे, ज्ञानेश्वर जगताप, हर्षल ढोरे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance