news
clock
निगडी परिसरातीस मेट्रो रेल्वेचे काम रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत बंद ठेवावे - सचिन काळभोर

निगडी परिसरातीस मेट्रो रेल्वेचे काम रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत बंद ठेवावे - सचिन काळभोर

निगडी परिसरातीस मेट्रो रेल्वेचे काम रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत बंद ठेवावे - सचिन काळभोर 

पिंपरी, ता. ५ - मेट्रो रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम पिंपरी ते निगडीपर्यंत सुरु आहे. त्यासाठी पोकलेन यंत्राद्वारे रस्त्यावर खड्डे खोदले जात असल्याने  आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज येतो. या आवाजाचा त्रास परिसरातील नागरीकांना विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. हे काम रात्री १० ते पहाटे ६ यावेळेत पूर्णतः बंद ठेवावे, असी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

आता दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसांतच सुरु होणार आहेत. त्यामुळे, पुणे मेट्रो प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर ह्यांनी ताबडतोब दखल घ्यावी. निगडी बस स्टॉप परिसरात रस्त्यावर खड्डे खोदण्याचे  काम रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवावे. या संदर्भात पोलिस कंट्रोल रूम व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या प्रश्नी प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना करावी, अन्यथा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम नागरीकांकडून बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी, असा इशारा काळभोर यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories