पत्नीला पळवून नेल्याच्या संशायातून भोसरीमध्ये तरुणाची आत्महत्या

पत्नीला पळवून नेल्याच्या संशायातून भोसरीमध्ये तरुणाची आत्महत्या

पत्नीला पळवून नेल्याच्या संशायातून भोसरीमध्ये तरुणाची आत्महत्या

पिंपरी, ता. ६ - आपल्या पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याच्या संशयाने एका तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) धावडेवस्ती-भोसरी येथे घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे. मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी हा तरुण एका इमारतीवर चढला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते तेथे पोचले. पोलिसांवनी व महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी  खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. 

तरुणाने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबत बोलणे करुन दिले. त्यानंतर त्याने इमारतीवरुन उडी मारली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र,  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

केसरी साहू याने सोशल मीडियावर चार पानांची सुसाईड नोट व्हायरल केली आहे. आपल्या पत्नीला कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय केसरीला होता. त्याने पोलिसांत तक्रारही दिली होती. 

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories