news
clock
पर्यटन व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक

पर्यटन व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक

पर्यटन व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. ५ - पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करुन महिना जादा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडल्याने एका महिलेची १८ लाख ३५ हजार ७५९/- रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना पिंपरीमध्ये सन २०१७ ते २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत, महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश शिवराज चौधरी (वय ४० वर्षे, व्यवसाय टुर्स अॅन्ड ट्रॅव्हेल्स, रा. पिंपरी) याने फिर्यादी महिलेला  त्याच्या "वन वर्ल्ड टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स"च्या व्यवसायाची माहिती दिली आणि या व्यवसायामध्ये २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास दर महिना ६०,०००/- ते ७०,०००/- रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. 

या आमिषाला फिर्यादी महिला बळी पडली तिने धनादेशाद्वारे २५ लाख रुपये गुंतवणुक स्वरुपात चौधरी याला दिले. पुढे, परतावा दिला नाही. गुंतवणुकीच्या रकमेपैकी ६ लाख ६२ हजार २४१/- रुपये परत करुन उर्वरीत रक्कम १८ लाख ३५ हजार ७५९/- रुपयांचा अपहार केला आणि परतावाही दिला नाही. 

पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात बुधवारी (ता. ४) पिंपरी पोलिस ठाण्यात कलम ३१८ (४), ३५२. ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories