news
clock
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांची आज निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांची आज निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांची आज निवड

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज शुक्रवारी (ता. ६) होणाऱ्या विशेष सभेमध्ये महापौर व उपमहापौर निवडीची घोषणा होणार आहे. त्यानंतर नवे महापौर अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. 

महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत १२ मार्च २०२२ रोजी संपली. त्यानंतर आजपर्यंत प्रशासकीय राजवट आहे. आज नव्या महापौरांची निवड होऊन प्रशासकीय राजवट संपले. सर्व लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. 

 महापालिका भवनामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी ११ वाजता महापौर व उपमहापौर निवडीसाठीची विशेष सभा होईल. महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला १२८ पैकी ८४ जागांवर बहुमत मिळाले आहे. भाजपकडून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित झाले आहे तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे नाव निश्चित केले आहे. विशेष सभेमध्ये महापौर व उपमहापौर पदाच्या नावांची औपचारीक घोषणा केवळ बाकी आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories