news
clock
पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

  पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

पिंपरी, ता. २२ -  पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय धनुर्विद्या निवड चाचणीत स्पर्धेत कौतुकास्पद यश मिळवले. येत्या २८ फेब्रुवारीला सोलापूर येथे होणाऱ्या १५, १३ व १० वर्षांखालील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कार्तिक ताकभाते, रुद्र कुंभार, हर्ष खाळसोडे, धनश्री ताकभाते यांचा समावेश आहे. १० वर्ष वयोगटात कंपाउंड राउंडमध्ये चैतन्य घोलपला रौप्य, क्षिती कुलकर्णीला कांस्यपदक मिळाले.  इंडियन राउंडमध्ये इरा शेखला रौप्यपदक मिळाले. १३ वर्ष वयोगटात कंपाउंड राउंडमध्ये हर्षवर्धन शितोळे व इशिता घोलपला चतुर्थ क्रमांक, तर इंडियन राउंडमध्ये अमुक्ता गीतेला रौप्यपदक मिळाले. १५ वर्ष वयोगटात कंपाउंड राउंडमध्ये धवल पवारला रौप्यपदक व स्वामिनी शितोळेला चतुर्थ क्रमांक मिळाला. कार्तिक ताकभाते, रुद्र कुंभार, हर्ष खाळसोडे, धनश्री ताकभाते या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. द्रोणा आर्चरीचे प्रशांत शिंदे हे प्रशिक्षक आहेत.

यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे पालकांतर्फे व प्रशिक्षण केंद्रातर्फे अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories