news
clock
पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करावे - संदीप वाघेरे

पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करावे - संदीप वाघेरे

पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करावे - संदीप वाघेरे  

पिंपरी, ता. ६ - निगडी-दापोडी रस्त्यावरील पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलासमोर छोट्या (हलक्या) वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारणीचे काम आता लवकरच सुरु आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यासाठी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमधून या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे व अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या संदर्भात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया राबवून काम सुरु करण्याची मागणी केली आहे.

वाघेरे यांनी सांगितले आहे की, पिंपरी LC गेट क्र. ६० येथे उभारण्यात येत असलेला चार पदरी रेल्वे उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. हा उड्डाणपूल पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र, उड्डाणपूलावरून येणाऱ्या वाहनांना पुणे- मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत वळसा घ्यावा लागतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी वाघेरे यांनी पुढाकार घेतला. 

सदर प्रकल्पाचा समावेश सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला असून महापालिका सभेने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या भुयारी मार्गासाठी एकूण रु. ४० कोटींची प्रशासकीय मान्यता असून चालू आर्थिक वर्षासाठी रु. १० लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरु झाल्यास हलक्या वाहनांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे, असे वाघेरे यांनी सांगितले. आयुक्तांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते सतिश गावडे, राकेश मोरे, सतीश लांडगे उपस्थित होते. 

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories