news
clock

पुणे महापालिकेकडून 'टीडीआर'च्या कार्यपद्धतीत बदल

पुणे, ता. १६ - नागरीकांना पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महापालिका विविध जागांवर आरक्षित करते.  त्यासाठी जागा मालकांना 'टीडीआर'च्या (हस्तांतरण विकास हक्क) स्वरुपात मोबदला दिला जातो. आता या 'टीडीआर'च्या कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केले आहेत. या दरम्यानचा अतिरिक्त आयुक्तांचा टप्पा आता वगळण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. 

महापालिकेकडून, जागा मालकांना टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कार्यपद्धतीमध्ये मोबदला देण्यास  विलंब लागतो. 'टीडीआर'चा प्रस्ताव सादर झाल्यानंतर सर्व खात्यांची मान्यता मिळाल्यानंतर तो पुन्हा 'डीआरसी' (हस्तांतरण विकास हक्क प्रमाणपत्र) देण्यासाठी पहिल्यापासून पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागते. त्यामध्ये 'डीआरसी' देण्यासाठी नगर अभियंता यांच्या स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर थेट प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी जाणार आहे. या दरम्यानचा अतिरिक्त आयुक्तांकडे टप्पा आता वगळण्यात आला आहे. 

टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यासाठीचा कालावधी कमी करण्यासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी परिपत्रक काढून बदल केले आहेत. या बदलामुळे टीडीआर मिळण्यासाठी वेळेची बचत होणार आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories