मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन  

पिंपरी, ता. ४ - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्रामार्फत ११ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत मोफत 'मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक शेतकरी व तरुणांनी या शिबिरात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे. राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानअंतर्गत होणारे हे शिबिर निवासी असणार आहे. शिबिरामध्ये कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance