news
clock
महापालिकेच्या थेरगाव व लांडेवाडी उर्दू शाळांचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

महापालिकेच्या थेरगाव व लांडेवाडी उर्दू शाळांचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

महापालिकेच्या थेरगाव व लांडेवाडी उर्दू शाळांचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

पिंपरी, ता. ४ - अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव उर्दू प्राथमिक शाळा व लांडेवाडी उर्दू प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने गौरवण्यात आले. महापालिका शाळांमधील शिक्षक हनीफ कुंभार व मोहसीन मोमीन यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये रविवारी (ता. १) आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हे सन्मान प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष इल्हाजुद्दिन फारुकी, सरचिटणीस अब्दुस सलाम इनामदार, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, महाराष्ट्र मुस्लीम कॉन्फरन्सचे अध्यक्ष जुबेर मेमन, नगरसेवक गफुर पठाण उपस्थित होते. 

महापालिकेच्या थेरगाव आणि लांडेवाडी येथील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. या यशाबद्दल सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षिका खालेदा खान, माजी मुख्याध्यापिका शाहेदा सय्यद, प्रभारी मुख्याध्यापिका रुबीना पठाण यांनी पुरस्कारार्थी शाळा व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories