news
clock
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी,  ता.  ४ - मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ३ लाख ७९ हजार रुपयांचे मंगळसूत्र एका २९ वर्षीय युवकाने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (ता. ३) सकाळी ६ वाजता रहाटणी येथील नखाते चौकाजवळ घडली आहे. काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

याबाबत, आत्माराम आबु माने (वय ६४ वर्षे, सेवानिवृत्त, रा. रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी माने व त्यांची पत्नी आकांक्षा मंगळवारी (ता. ३) सकाळी चालायला गेले असताना करीत आरोपी संजय नरसिंम लुनक्का (वय २९ वर्षे) याने महिलेच्या गळयातील ३ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या झटापटीत महिलेला मारहाणही केली आहे. 

काळेवाडी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ११५ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories