news
clock
राजपथावरील एनसीसी संचलानामध्ये पिंपळे सौदागरमधील तनू भान ठरली 'बेस्ट कॅडेट'

राजपथावरील एनसीसी संचलानामध्ये पिंपळे सौदागरमधील तनू भान ठरली 'बेस्ट कॅडेट'

राजपथावरील एनसीसी संचलानामध्ये पिंपळे सौदागरमधील तनू भान ठरली 'बेस्ट कॅडेट' 

पिंपरी, ता. ९ - प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचलानामध्ये पिंपळे सौदागर येथील तनू भान ही विद्यार्थिनी सहभागी झाली. तिने देशपातळीवर महाराष्ट्राचा ठसा उमटवला. राष्ट्रीय छात्र सेनेतील ज्युनिअर अंडर ऑफिसर असलेल्या तनूला आर्मी विंग मधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ सन्मान मिळाला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तनू व तिच्या पालकांचा विशेष सन्मान केला.    

प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलानानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनूला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. राष्ट्रसेवेची ओढ, शिस्त, शारीरिक क्षमता, नेतृत्व, आत्मविश्वास या आधारेच ततूने ही उत्कृष्ट कामगिरी केली. तनु भान ही पिंपळे सौदागर येथील रहिवासी आहे. तिच्या या यशामुळे ती राहात असलेल्या परिसराचे, संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे आणि महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर सन्मानाने उंचावले आहे. 


नगरसेवक काटे यांनी तनू आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिचा विशेष सन्मान केला. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांनी तिच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले. काटे म्हणाले, ''तनू भान ही पिंपळे सौदागरची कन्या असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तिने केवळ आपल्या पिंपळे सौदागरचाच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराची आणि महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली आहे. तनूचे यश महाराष्ट्राच्या मुलींच्या क्षमतेचे आणि देशातील महिलाशक्तीचे तेजस्वी उदाहरण आहे. शिस्त, परिश्रम आणि देशभक्तीच्या बळावर मुली कोणतेही शिखर सर करू शकतात, याचा अभिमानास्पद संदेश तनुने देशाला दिला आहे. तिची ही वाटचाल हजारो तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल. ''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories