राजस्थानमधून आणलेला २८ लाखांचा 'अफिम' अंमली पदार्थ रावेतमध्ये जप्त, आरोपी अटकेत
Feb 06 2026
42
राजस्थानमधून आणलेला २८ लाखांचा 'अफिम' अंमली पदार्थ रावेतमध्ये जप्त, आरोपी अटकेत
पिंपरी, ता. ६ - राजस्थानमधून आणलेला एकूण २८ लाख ०५ हजार ६८५/- रुपये किंमतीचा 'अफिम' हा अमंली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाला रावेत येथून बुधवारी (ता. ४) अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमल पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
श्रवणलाल बहादुरराम देवासी (वय ३६ वर्षे, ड्रायव्हर रा. चंदलाई पाली राजस्थान, सध्या रा. २ धनराज चौधरी) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा वाहनचालक आहे. त्याने तो चालवत असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून एकूण २८ लाख ०५ हजार ६८५/- रुपये किंमतीचा ४४९ ग्रॅम ५७मिली ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ माल बेकायदेशिररित्या विक्रीसाठी आणला होता.
आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा अंमली पदार्थ राजस्थान येथील ट्रॅव्हल्स कार्यालयातून आणला असल्याचे सांगितले. हा अंमली पदार्थ धनराज चौधरी याच्याकडून आणला असून तो विनोद या व्यक्तीला देण्यासाठी आलो आहे असे सांगितले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. तीन आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट व सह अन्न व सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------