राष्ट्रीय ननचाकू स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचा तृतीय क्रमांक   

पिंपरी, ता. ९ -  उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ननचाकू स्पर्धा (National Nunchaku Championship) व पंच सेमिनार स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेत देशभरातून सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ननचाकू ही मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकाराचा वापर करुन कौशल्य, वेग आणि कलात्मकता दाखवणारी स्पर्धा आहे. ननचाकू असोसिएशन ऑफ इंडिया (NAI) आणि वर्ल्ड ननचाकू असोसिएशन (WNA) या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित करतात. 

महाराष्ट्रातील खेळाडूंनी फ्री-स्टाइल, काथा आणि कुमिते या क्रिडा प्रकारांत चमकदार कामगिरी केली. एकांतिका रेड्डी, स्वरा हवळने, स्वरूप एकावडे, अयान शेख, स्वरूपा नामदे, आरुष मोरे, खुशी गुप्ता, अनन्या माने, तृप्ती वाडकर, जिक्रा खान, ओवी मालुसरे, आराध्या मालुसरे, सोहम मालुसरे, युवराज मालुसरे, शिवराज मालुसरे आणि आर्यन जोरवर हे विविध पदकांचे मानकरी ठरले. दीपक शिर्के, स्वरूप एकवाडे, अनिल शिंदे, विजय कांबळे, रिदम तिवारी, स्वरा जाधव आणि अक्सा मुल्ला यांनी पंच स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. खेळाडूंना महाराष्ट्र ननचाकू संघाचे महासचिव दीपक शिर्के यांचे मार्गदर्शन मिळाले. ननचाकू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रोहित सक्सेना, अध्यक्ष संजय कपूर आणि महासचिव बाबूल वर्मा यांनी विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या राष्ट्रस्तर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने शिस्तबद्ध खेळ सादर केला. या यशामुळे राज्यातील ननचाकू खेळाडूंमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. या कामगिरीबद्दल खेळाडूंसह प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे शहरात अभिनंदन होत आहे व पुढील भरीव कामगिरीसाठी या खेळाडूंना शुभेच्छाही क्रिडाप्रेमींनी दिल्या आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance