लोणावळा नगरपरिषदेने 'कार्डियाक अॅम्ब्युलन्स' उपलब्ध करुन द्यावी, महिला मंडळाची मागणी
Feb 06 2026
50
लोणावळा नगरपरिषदेने 'कार्डियाक अॅम्ब्युलन्स' उपलब्ध करुन द्यावी, महिला मंडळाची मागणी
पिंपरी, ता. ६ - त्यामुळे आपत्कालीन वेळेसाठी लोणावळा नगरपरिषदेने तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांसह 'कार्डियाक अॅम्ब्युलन्स' (हृदयरोग रुग्णवाहिका) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोणावळा महिला मंडळाने केली. त्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी नुकतीच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांची भेट घेतली. सोनवणे यांनीही नगरपरिषदेकडून लवकरात लवकर रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल असे सांगितले.
मागणीचे निवेदन देताना, महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी, उपाध्यक्षा मेधा वैद्य, सचिव प्रतिमा खळदकर, खजिनदार सुनीता रावण, सहखजिनदार श्रुतिका राणे तसेच महिला मंडळाच्या सल्लागार अश्विनी धारप उपस्थित होत्या.
लोणावळ्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे मोठे रुग्णालय उपलब्ध नाही. एखादा गंभीर प्रसंग उद्भवल्यास उपचारासाठी थेट पुणे किंवा मुंबई गाठणे अवघड आहे. त्यामुळे लोणावळ्यामध्ये सर्व सोयींनी युक्त 'कार्डियाक' रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे, असे महिलांनी सांगितले. ही मागणी निश्चितपणे पूर्ण होईल असे नगराध्यक्ष सोनवणे यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------