news
clock
शहरात सात नवीन स्वस्त धान्य दुकाने लवकरच सुरु होणार

शहरात सात नवीन स्वस्त धान्य दुकाने लवकरच सुरु होणार

शहरात सात नवीन स्वस्त धान्य दुकाने लवकरच सुरु होणार 

पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवडमध्ये सात नवीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळाली होती. निवडणुकीमुळे ही नवीन दुकाने अद्याप सुरु झाली नव्हती. आता, फेब्रुवारी महिन्याचे धान्य उपलब्ध झाले की लगेच ही नवीन दुकाने सुरु होणार आहेत. नवीन दुकानांना मशीनही दिले जाणार आहे. पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.  

नवीन दुकानांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या २५३ वरून २६० इतकी होणार आहे. नवीन सात दुकानांचे व्यवस्थापन शहातील महिला बचत गट सांभाळणार आहेत.

मंजूर झालेल्या नवीन स्वस्त धान्य दुकानांमध्ये अ परिमंडळात डांगे चौक, रहाटणी, पिंपळे निलख, मामुर्डी  या ठिकाणी एकूण ४ दुकाने, ज परिमंडळामध्ये वैभवनगर-पिंपरीगाव येथे १ दुकान आणि क परिमंडळामध्ये दापोडी व चिंचवड स्टेशन येथे २ दोन दुकाने यांचा समावेश आहे. महिला बचत गट या दुकानांचे व्यवस्थापन सांभाळणार असल्याने धान्य वितरण अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.  

याबाबत, ज परिमंडळ अधिकारी प्रदीप डंगारे म्हणाले की, नवीन मंजूर सर्व स्वस्त धान्य दुकानांना यंत्र देण्यात आली आहेत. धान्यसाठा उपलब्ध झाल्यावर दुकाने सुरु होतील.

नवीन दुकानांचे व्यनस्थापन पाहणाऱ्या बचत गटांची नावे .....

- 'अ' परिमंडळ - डांगे चौक येथे राजनंदिनी महिला बचत गट,  रहाटणी येथे कमल महिला बचत गट, पिंपळे निलख येथे श्री माऊली -महिला स्वयंसहायता बचत गट, मामुर्डी येथे सिद्धिविनायक महिला बचत गट

-'ज' परिमंडळ -  वैभवनगर-पिंपरी गाव येथे पुनाकर माता महिला बचत गट

- 'क' परिमंडळ - दापोडी येथे स्वामी समर्थ महिला बचत गट, चिंचवड स्टेशन येथे लक्ष्मीदेवी महिला बचत गट


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories