news
clock
सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी

सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी

सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी

पिंपरी, ता. ३ - राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. आता त्यांच्याकडे यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (ता. ३) जारी केले आहे. शनिवारी (ता. ३१) सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळनेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. 

याबरोबरच, अजितदादांकडे असलेल्या पुणे व बीडच्या पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याबाबतही उत्सुकता निर्माण झाली होती. सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्याने कार्यकर्त्यांमध्ये व नागरीकांमध्ये समाधानाची भावना पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories