news
clock
सोमाटणेमध्ये दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

सोमाटणेमध्ये दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

सोमाटणेमध्ये दगड डोक्यात घालून तरुणाचा खून 

पिंपरी, ता. ६ - आईवरुन शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका २४ वर्षीय युवकाने ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाची दगड डोक्यात घालून हत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) मौजे सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, आकाश बालाजी शिंदे (वय २७ वर्षे, नोकरी, तळेगाव दाभाडे) याने फिर्याद दिली आहे.  

आरोपी सनी प्रमोद चव्हाण (वय २४ वर्षे, रा. शिरगाव, ता. मावळ) याला गुरुवारी (ता. ५) ३० ते ३५ वयाच्या अनोळखी इसमाने आईवरुन शिवीगाळ केली. त्याचा प्रचंड राग आल्याने आरोपी सनी याने आपल्या दोन्ही हातात मावेल एवढ्या आकाराचा दगड ५-६ वेळा त्या शिव्या देणाऱ्या इसमाच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories