स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याची मुदत वाढवून घेणार - आयुक्त श्रावण हर्डीकर
Feb 07 2026
68
स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याची मुदत वाढवून घेणार - आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी, ता. ७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीसमोर सादर होते व मार्चमध्ये त्याला अंतिम मंजूरी मिळते. मात्र, यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापालिकेवरची प्रशासकीय राजवट संपून शुक्रवारी (ता. ६) सभागृह नव्याने सुरु झाले आहे. स्थायी समितीच्या सदस्यांची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत स्थायी समितीसमोर अंदाजपत्र सादर करता न आल्यास राज्य शासनाकडून अतिरिक्त मुदत मागून घेऊन अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर झाला होता, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु आहे. मात्र, सभागृह नव्याने सुरु आहे. विविध समित्यांचे सभापती व सदस्य २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत निवडले जाणार आहेत. त्यामुळे, महापालिकेचे अंदाजपत्रक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीला सादर करणे अवघड आहे. त्यामुळे स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर करण्यासाठी वेळ वाढवून घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------------------------