चिंचवडमध्ये आज व उद्या स्काऊट्स-गाईड्स मेळावा 

पिंपरी, ता. ७ - चिंचवड येथील स्व. शंकरलालजी मुथा स्काऊट्स व गाइड्स नगरी येथे जिल्हा स्काऊट्स व गाइड्स मेळाव्याचे आयोजन शनिवार (ता. ७) व रविवारी (ता. ८) केले आले आहे.

या दोन दिवसीय मेळाव्यात स्काऊट्स व गाइड्स सुमारे १,२०० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत.  उद्घाटन, शेकोटी, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, बक्षीस वितरण व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत, असे मेळावा आयोजन समितीचे सहायक जिल्हा आयुक्त राजेंद्रकुमार मुथा, अनिल कांकरिया, दिगंबर करंडे, उषा हिवराळे, सोनल सुतार व विजयकुमार जोरी यांनी सांगितले.

पुणे भारत स्काऊट्स आणि गाइड्स जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद पुणे, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित, श्री फत्तेचंद जैन विद्यालय व सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance