news
clock
जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका होतेय सज्ज, ५०० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती

जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका होतेय सज्ज, ५०० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती

जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका होतेय सज्ज, ५०० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती 

पिंपरी, ता. ९ - देशात सन २०२७ ची जनगणना १६ एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील जनगणनेसाठी महापालिकेने पाच हजार ५०० प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.  

जनगणनेच्या या विशेष प्रशिक्षण मोहिमेत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रांवर सत्र घेतली जात आहेत. या सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती, घरगुती सर्वेक्षण पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, विदा (डेटा) संकलनातील अचूकता आणि नागरिकांशी प्रभावी संवाद याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. राज्यभरात  

जनगणनेचा  टप्पा १६ मे ते १४ जूनदरम्यान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८० ते २०० घरांचा एक गट (ब्लॉक) तयार करण्यात येणार आहे. जनगणनेसाठी घरांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे शहराच्या लोकसंख्येची, सामाजिक व आर्थिक स्थितीची व्यापक माहिती मिळणार आहे.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, ''जनगणना प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना सहकार्य करावे. अचूक व योग्य माहिती द्यावी. जनगणनेनंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.''

शहराची थोडक्यात माहिती.....

-२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या : १७ लाख २७ हजार ६९२

-सध्याची लोकसंख्या : सुमारे ३५ लाख

- शहराचे एकूण क्षेत्रफळ : १७३.१२ चौरस किलोमीटर

-रहिवासी क्षेत्र : चार हजार ८९३ हेक्टर

-व्यापारी क्षेत्र : ६७२ हेक्टर

-औद्योगिक क्षेत्र : एक हजार ९७६ हेक्टर

-उद्यान, मैदानाचे क्षेत्र : ३७८ हेक्टर

-सार्वजनिक क्षेत्र : ४३० हेक्टर

-वाहतुकीचे क्षेत्र : एक हजार ६७४

-संरक्षण विभागाचे क्षेत्र : नऊ हेक्टर आहे.









Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories