news
clock
हातभट्टीच्या दारुचे रसायन बाळगणाऱ्या युवतीवर गुन्हा

हातभट्टीच्या दारुचे रसायन बाळगणाऱ्या युवतीवर गुन्हा

हातभट्टीच्या दारुचे रसायन बाळगणाऱ्या युवतीवर गुन्हा 

पिंपरी, ता. ५ - हातभट्टीच्या दारुचे १ लाख ४० हजार रुपयांचे रसायन शिरगाव पोलिसांनी बुधवारी (ता. ४) मौजे शिरगाव येथे पकडले आहे. हे रसायन बाळगणारी युवती पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली.

आरोपी युवतीवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ क, फ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे शिरगावच्या हद्दीत आरोपी युवती हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे ४,००० लीटर गूळ मिश्रीत कच्चे रसायन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा प्रोव्हिशनचा माल बेकादेशीररित्या भिजत घालताना सापडली. पोलीसांची चाहूल लागताच ती त्या ठिकाणहून पळून गेली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories