news
clock
हार्डवेअर व्यावसायिकाची २३ लाखांची फसवणूक करणारा अटकेत

हार्डवेअर व्यावसायिकाची २३ लाखांची फसवणूक करणारा अटकेत

हार्डवेअर व्यावसायिकाची २३ लाखांची फसवणूक करणारा अटकेत 

पिंपरी, ता. ५ - हार्डवेअरच्या दुकानातून विश्वासाने नेलेल्या तब्बल २३ लाख २८ हजार रुपयांच्या सामानाचे पैसे किंवा ते सामान परत न दिल्याने एका हार्डवेअर दुकानमालकाची मोठी फसवणूक झाली आहे. ही घटना तळवडे-देहूगाव येथे घडली २६ नोव्हेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधी घडली आहे.  

याबाबत, दुकानचालक राजेंद्र दशरथ भसे (वय ५४ वर्षे, व्यवसाय, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कुमार रवी लालबहादूर सिंग (वय ४३ वर्षे, सध्या रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. 

आरोपी सिंग याने फिर्यादी भसे विश्वास संपादन करुन फिर्यादीच्या मालकीच्या हार्डवेअर दुकानातून एकूण २३ लाख २८ हजार १९८/- रुपयाचे हार्डवेअर साहित्य नेले. मात्र, या सामानाचे पैसे परत कले नाहीत किंवा नेलेले हार्डवेअरचे साहित्यही परत न करता मालाचा अपहार केला. 

आरोपी अटक असून त्याच्याविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories