news
clock
'इनोव्हेटर हॅकेथॉन'मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

'इनोव्हेटर हॅकेथॉन'मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

'इनोव्हेटर हॅकेथॉन'मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग 

पिंपरी, ता. ४ - पीसीईटी आणि एनएमव्हीपीएम संचलित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी) येथे टी-हबच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटर हॅकेथॉन-२०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

अभियांत्रिकी कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम साकार झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश कुलकर्णी, नॉर्मा ग्रुप ऑफ

इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक परशुराम घेवाडे, श्रीनिवास तलुका आदी मान्यवर उपस्थित होते. 

या हॅकथॉनमध्ये विविध अभियांत्रिकी तंत्रज्ञ, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांतील सहभाग घेतला.  

अत्याधुनिक केंद्रीय ग्रंथालयाचे तसेच इंटेल एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन एआयसीटी, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे व एटॉसचे उपाध्यक्ष माधव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. रोहिणी हंचाटे, मुजाईद शेख, प्रा. प्रीतम आहेर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, सहसचिव विनायक अभ्यंकर, खजिनदार राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories