news
clock
'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदी रवी लांडगे व उपमहापौपदी शर्मिला बाबर विराजमान

'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदी रवी लांडगे व उपमहापौपदी शर्मिला बाबर विराजमान

'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदी रवी लांडगे व उपमहापौपदी शर्मिला बाबर विराजमान

पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांची महापौरपदी व उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. महापालिकेच्या आज शुक्रवारी (ता. ६) झालेल्या विशेष सभेत या महापौर व उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापौरपदासाठी रवी लांडगे हे एकमेव उमेदवार होते व ते बिनविरोध निवडून आले. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शर्मिला बाबर यांचीही  बिनविरोध निवड झाली. या विशेष बैठकीमध्ये महापौर,उपमहापौरांसह विरोधी पक्षनेते, सत्तारुढ पक्षनेते यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला निधन झाले आहे. त्यामुळे या प्रसंगी कोणताही आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाही. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.   

यावेळी, आमदार महेश लांडगे म्हणाले, ''निष्ठा-समर्पण आणि शाश्वत विकास ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाची त्रिसूत्री असेल. त्या अनुशंगाने आम्ही सर्वजण एकजुटीने पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहोत. भारतीय संविधान आणि देव-देश-धर्म-संस्कृती संवर्धनाचा संकल्प आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर देशातील विकासित शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर राहील. हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संकल्प करीत आहोत.''

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories