'पीएमआरडीए'च्या नदी सुधार प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ
पिंपरी, ता. ३ - इंद्रायणी व पवना नदीचे प्रदूषण थांबवण्याठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी 'पीएमआरडीए'ने कंत्राटदार नियुक्तीच्या ई-टेंडर प्रक्रियेत सुधारणा करुन या प्रक्रीयेला मुदतवाढ दिली आहे. आवश्यक तांत्रिक अनुभव व पात्रता असलेल्या कंत्राटदारांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाने केले आहे.
नदी सुधार प्रकल्पासाठी पीएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. निविदा कागदपत्रे महाटेंडर्स पोर्टलवर https://mahatenders.gov.in] (https://mahatenders.gov.in उपलब्ध आहेत. निविदा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता सुरु होईल. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ पर्यंत आहे. आधी जाहीर केलेल्या अटी-शर्ती व तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले आहेत. ई-टेंडर प्रक्रियेतील पुढील कोणतेही बदल, सूचना किंवा सुधारणा महा टेंडर्स पोर्टलवरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर पीएमआरडीए, पुणे महानगर प्रदेश अंतर्गत मुख्य अभियंता (अभियांत्रिकी विभाग-२) यांचे नियंत्रण राहणार आहे, असे पीएमआरडीएने सांगितले आहे. पात्र असलेल्या कंत्राटदारांनी या निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाने केले आहे.