news
clock
''शुभेच्छा, द्यायच्याच तर पुष्पगुच्छ नकोत, महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा'', महापौर रवी लांडगे यांचे भेट देणाऱ्या नागरिकांकरीता आवाहन

पिंपरी, ता. ९ -  महापौर पदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नये. भेटवस्तू द्यायच्याच असतील तर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरतील अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक साहित्य शुभेच्छा रुपात द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

  महापौर रवी लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींची, नागरीकांची गर्दी होत आहे. शुभेच्छा  देणारी मंडळी मोठाले पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तू घेऊन येत आहे. त्यामुळे महापौर लांडगे यांनी हे आवाहन केले आहे. हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. सदर, उपक्रमातून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळणार असून, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची पूर्तता होण्यास हातभार लागणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याच्या या उपक्रमातून समाजात उपयुक्त संदेश जाणार आहे, असे महापौर लांडगे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बळ वाढावे, त्यांना आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे आणि समाजामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असेही महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories