news
clock
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा 

पिंपरी, ता. २४ - तळेगाव दाभाडे येथे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर सोमवारी (ता. २३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सोमवारी सायंकाळी रस्त्यात वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने उभी होती. तिने लैंगिक हावभाव करुन व तसे शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाजाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण केला.  सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. 

आरोपी महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories