news
clock
तळेगाव दाभाडे येथे वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा

तळेगाव दाभाडे येथे वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा

तळेगाव दाभाडे येथे वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा 

पिंपरी, ता. २७ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने तळेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणी विरोधात गुरुवारी (ता. २६) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक गुरुवारी (ता. २६) सायंकाळी गस्त घालत असताना सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील वडाच्या झाडाखाली संबंधित महिला येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना लैंगिक हावभाव करून व अश्लील शब्द उच्चारून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत, महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories