होळी व उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्ये रेल्वे १८६ विशेष गाड्या सोडणार, १८ फेब्रुवारीपासून बुकींग सुरु
पिंपरी, ता. १८ - लकरच येणारा होळीचा सण व उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे १८६ विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये ९४ होळी विशेष आणि ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांतून देशातील विविध महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या गाड्या धावणार आहेत.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण सुविधा १८ फेब्रुवारीपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अतिरिक्त सेवेमुळे शहरातील नागरीकांना होळीचा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येणार आहे. सुट्ट्यांसाठीही व्यवस्थित गावी पोचता येणार आहे.
असे असेल विशेष गाड्यांचे वेळापत्रक -
- ट्रेन क्रमांक ०२१४१/४२ सीएसएमटी- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष (एकूण १० फेऱ्या) या गाड्या २२ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान धावतील.
- ट्रेन क्रमांक ०११७१/७२ सीएसएमटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २६ फेब्रुवारी २०२६ व ५ मार्च २०२६ रोजी चालवण्यात येतील.
- ट्रेन क्रमांक ०१०७९/८० सीएसएमटी-गोरखपूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या) २१ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या कालावधीत धावतील.
- ट्रेन क्रमांक ०१११९/२० लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २६ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ दरम्यान कार्यरत राहिल.
- ट्रेन क्रमांक ०१०७३/७४ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या) २५ फेब्रुवारी २०२६ ते ७ मार्च २०२६, तर
- ट्रेन क्रमांक ०१०४३/४४ लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २४ फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ दरम्यान चालतील.
- ट्रेन क्रमांक ०११४३/४४ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या) २१ फेब्रुवारी २०२६ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत धावणार आहेत.
पुणे विभागातून निघणाऱ्या विशेष गाड्या
- ट्रेन क्रमांक ०१४६९/७० पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २४ फेब्रुवारी २०२६ ते ४ मार्च २०२६ दरम्यान धावतील.
- ट्रेन क्रमांक ०१४५७/५८ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २५ फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ दरम्यान धावतील.
- ट्रेन क्रमांक ०१४८१/८२ पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या) २३ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६ चालतील.
- ट्रेन क्रमांक ०१४४९/५० पुणे-दानापूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या) २१ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या कालावधीत धावतील.
- ट्रेन क्रमांक ०१४३१/३२ पुणे-गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या) २४ फेब्रुवारी २०२६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान धावतील.
- ट्रेन क्रमांक ०१४१५/१६ पुणे-गोरखपूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या) २१ फेब्रुवारी २०२६ ते ९ मार्च २०२६ कालावधीत चालतील
- ट्रेन क्रमांक ०१४९१/९२ पुणे-हजरत निझामुद्दीन साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) २७ फेब्रुवारी २०२६ ते ७ मार्च २०२६ दरम्यान धावणार आहेत.