news
clock
चाकण औद्योगिक परिसरात वाढती अल्पवयीन गुन्हेगारी, मुलांकडे लक्ष देण्याचे पोलिसांकडून पालकांना आवाहन

चाकण औद्योगिक परिसरात वाढती अल्पवयीन गुन्हेगारी, मुलांकडे लक्ष देण्याचे पोलिसांकडून पालकांना आवाहन

चाकण औद्योगिक परिसरात वाढती अल्पवयीन गुन्हेगारी, मुलांकडे लक्ष देण्याचे पोलिसांकडून पालकांना आवाहन

पिंपरी, ता. १८ - चाकण औद्योगिक पट्टयात गेल्या पाच वर्षांत या मुलांकडून १२ खून झाल्याची माहिती समोर आली आहे. समाजमाध्यमांचे आकर्षण आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे १४ ते १८ वयोगटातील मुले गंभीर गुन्ह्यांकडे वळत आहेत. पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. संशयित भागांत गस्त वाढवली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम होत आहेत. पालकांनी मुलांच्या वर्तनातील बदलांकडे लक्ष द्यावे, त्यांच्या मित्रपरिवाराची माहिती ठेवावी वेळोवेळी समुपदेशन घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टोळक्यांनी  दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, धमक्या देणे, किरकोळ वादातून एकमेकांवर हल्ले करणे असे  प्रकार चाकण आणि महाळुंगे परिसरात सातत्याने घडत आहेत. किरकोळ वादातून टोळ्या तयार करून हल्ले करण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. या मुलांचे पालक कामात व्यग्र असल्याने मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि मुले चुकीच्या मार्गाला जात आहेत. 

त्यामुळे, पालकांनी मुलांच्या वर्तनातील बदलांकडे लक्ष द्यावे, त्यांच्या मित्रपरिवाराची माहिती ठेवावी, मुलांशी सातत्याने संवाद साधावा, वेळोवेळी समुपदेशन घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories