news
clock
चिंचवड मुख्य टपाल कार्यालयातील आधार दुरुस्ती सेवा तात्पुरती बंद, इतर ६ पोस्टात पर्यायी व्यवस्था

चिंचवड मुख्य टपाल कार्यालयातील आधार दुरुस्ती सेवा तात्पुरती बंद, इतर ६ पोस्टात पर्यायी व्यवस्था

 चिंचवड मुख्य टपाल कार्यालयातील आधार दुरुस्ती सेवा तात्पुरती बंद, इतर ६ पोस्टात पर्यायी व्यवस्था 

पिंपरी, ता. २२ - चिंचवड मुख्य टपाल कार्यालयातील आधार दुरुस्ती सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे. चिंचवड मुख्य टपाल कार्यालयात नवीन यंत्रणा उभारणी व कामकाज वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर आधार दुरुस्ती सेवा पुन्हा पू्र्ववत सुरु होईल, असे टपाल विभागाकडून कळवण्यात आले आहे. 

 नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पोस्ट विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभी केली आहे. चिंचवड विभागातील ग्राहकांसाठी भोसरीगाव पोस्ट, निगडी पोस्ट, इन्फोटेक पार्क पोस्ट, हिंजवडी पोस्ट, पिंपरी कॉलनी मार्केट पोस्ट, पिंपरी खराळवाडी पोस्ट व दापोडी पोस्ट कार्यालय अशा सहा ठिकाणी आधार दुरुस्तीची सोय उपलब्ध केली आहे. काही केंद्रांवर सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी दुपारच्या सत्रात दररोज तीन ते चार तास सेवा दिली जात आहे.

चिंचवड मुख्य कार्यालयाचे उ‌द्घाटन झाले आहे. सध्या अंतर्गत कामकाज सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आधार सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. नवीन यंत्रणेची उभारणी पूर्ण होताच ही सेवा पुन्हा सुरु केली जाईल, अशी माहिती चिंचवड टपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आधार दुरुस्तीची पर्यायी सेवा उपलब्ध 

''चिंचवड मुख्य पोस्ट कार्यालयात आधार दुरुस्ती सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विभागाने सहा पोस्ट कार्यालयांत पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सेटअपचे काम पूर्ण होताच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल.'' - नितीन बने, जनसंपर्क अधिकारी, चिंचवड


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories