अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांचा नकार 

पुणे, ता. २६ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. २६) बारामती तालुका पोलिस ठाण्यात येत गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यांच्यासमवेत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार होते.

अजितदादांचा अपघात होऊन आता जवळपास एक महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप या बाबत कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. या बाबत वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही कारवाई होत नसल्याने रोहित पवार अधिकच आक्रमक झालेले आहेत. त्या मुळे बारामतीत येत गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित यांनी  केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व बापूराव दडस, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्याशी रोहित पवार, युगेंद्र पवार व वकील मंडळींनी चर्चा केली. मात्र, या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.  या शिवाय अपघात झाला, त्याच दिवशी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतलेली असल्याचे सांगत नवीन एफआयआर दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 

पोलिस एफआयआर दाखल करत नाही ही बाब दुर्देवी आहे.  एफआयआर दाखल करु नये यासाठी  पोलिसांवर कोणीतरी ताकदवान व्यक्ती दबाव आणत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नेमका काय तपास करत आहे ते आम्ही पुण्यात जाऊन समजून घेतो.  ज्या विमानात तांत्रिक बिघाड आहे असे विमान अजितदादांना का दिले गेले हाच आमचा प्रश्न आहे.  हे आंदोलन नाही तर अजितदादांना न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कागदपत्रे समोर आणली आहेत ती तपास यंत्रणांना देत आहोत. आता

राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे, आम आदमी पक्षाचे खासदार हा मुद्दा संसदेत मांडणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संबंधित विमान कंपनीसोबत लागेबांधे असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance