news
clock
आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात मातृ-पितृ पूजन सोहळा

आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात मातृ-पितृ पूजन सोहळा

 आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात मातृ-पितृ पूजन सोहळा

पिंपरी, ता. २५ - आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात मातृ-पितृ पूजन सोहळा पार पडल विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करुन, फुले वाहून पालकांच्या गळ्यात हार घालून आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून वंदन करुन भोवती सात प्रदक्षिणा घातल्या.  आई-वडिलांची अखंड सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. आई-वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून  'यशस्वी व्हा' असा आशीर्वाद दिला.

माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेची सहल यावर्षी रायगड किल्ल्यावर गेली होती, सहलीवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील तीन क्रमांकाचे विद्यार्थी व एक उत्तेजनार्थ विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी आळंदीतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. आभार वैशाली शेळके यांनी मानले. सूत्रसंचालन राहुल चव्हाण, आरती गावडे यांनी केले.

दरम्यान, यावेळी माजी विद्यार्थी नितीश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांसाठी एक रोबोटिक मॉडेल व १० हजार १११ रुपये प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी देऊन शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories