पवनाथडी जत्रेचे सांगवीमध्ये उद्घाटन, १ मार्चपर्यंत जत्रा सुरु राहणार
बचत गटांतील महिलांनी बनवलेले असंख्य खाद्यपदार्थ, विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध, सांस्कृतिक कार्यतक्रमांचेही आयोजन
पिंपरी, ता. २६ - ''पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रा हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भर देत आहे. भविष्यात शहरात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती कशी करता येईल, यासाठी महापालिका निश्चितच पुढाकार घेईल.'', असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शकुंतला धराडे,नगरसदस्य शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, शाम जगताप, कुणाल व्हावळकर, धर्मपाल तंतरपाळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, बाबासाहेब त्रिभुवन, संजय काटे, प्रभाकर वाघेरे, तानाजी बारणे, तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे, अनुराधा गोरखे, आरती चौंधे, मनिषा पवार, सुषमा तनपुरे, दिप्ती कांबळे, पल्लवी जगताप, निता पाडाळे, सुप्रिया चांदगुडे, नीता जगताप, सारिका मासुळकर, रविना आंगोळकर, योगिता नागरगोजे, कुंदा भिसे, अनिता काटे, सविता खुळे, दिप्ती कांबळे, अर्चना तापकीर, श्रध्दा लांडगे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, उपायुक्त सिताराम बहुरे, संदीप खोत,अर्चना केरूरे, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या राणी पठारे यांनी आभार मानले मानले. यानंतर झालेल्या ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरवासियांनी आवर्जून जत्रेत सहभागी व्हावे.....
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सुरु झाली आहे. १ मार्चपर्यंत जत्रा सुरु राहणार आहे. जत्रेत ८०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव जपणारे शाकाहारी व मांसाहारी यांसह पारंपरिक पदार्थही येथे उपलब्ध आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पवनाथडी जत्रा सर्वांसाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे. शहरवासियांनी आवर्जून जत्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.