'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आर्थिक सहाय्य योजनेसाठी आवाहन
पुणे, ता. १२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) संस्थेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
या परीक्षेसाठी, पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी पंधरा हजार रुपये एकरकमी आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत केले आहे.