news
clock
लोणावळ्यात  स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करावे, नगरसेविका नयना पैलकर यांची मागणी

लोणावळ्यात स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करावे, नगरसेविका नयना पैलकर यांची मागणी

लोणावळ्यात  स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करावे, नगरसेविका नयना पैलकर यांची मागणी 

पिंपरी, ता. २७ - लोणावळा शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करावे, मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका नयना योगेश पैलकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, लोणावळा व मावळ परिसरातील अनेक विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंग, पोलिस भरती आदी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शन, ग्रंथालय, अभ्यासिका तसेच डिजिटल सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक खर्च वाढत असून, ग्रामीण व निम्न मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यात यावे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories