पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकाला सोमवारी मंजुरी मिळणार
पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांकडून प्रभागातील कामांच्या समावेशासाठी उपसूचना देण्यासाठी स्थायी समितीने अंदाजपत्रकाची सभा बुधवारी (दि. ११) पुन्हा तहकूब केली. त्यामुळे अंदाजपत्रकाची मंजुरी लांबणीवर गेली आहे. आता येत्या सोमवारी अंदाजपत्रकाला (ता. १६) मान्यता दिली जाणार आहे.
२८ फेब्रुवारीला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे विविध योजनांसह ९३२२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सादर केले. त्यानंतर, स्थायी समितीची अर्थसंकल्पाबाबतची बैठक ४ मार्च, नंतर ११ मार्चपर्यंत आणि आता १६ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी (ता. १६) होणाऱ्या सभेत अंदाजपत्रकाला मंजुरी दिली जाईल.